ग्रामपंचायत कुरुंगवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

नवीन वर्ग खोलीचे बांधकाम

ग्रामपंचायत कुरुंगवाडी अंतर्गत गाव गव्हांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हांडे येथे विद्यार्थ्यासाठी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात येत आहे

नवीन वर्ग खोलीचे बांधकाम Read More »

कुरुंगवाडी गावामध्ये प्रथमच साकारली ‘ग्रीन जिम’

नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी ग्रामपंचायत ने खुली ‘ग्रीन जिम’ सुरू केली. या ‘ग्रीन जिम’च्या माध्यमातून नागरिकांना व्यायामाची सवय लागणार आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिक युवकांना व्यायामाचे महत्त्व पटावे, त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ग्रामपंचायत ने खुली ‘ग्रीन जिम’ सुरू करण्यात आली. आहे

कुरुंगवाडी गावामध्ये प्रथमच साकारली ‘ग्रीन जिम’ Read More »

गावकऱ्यांनी केला श्रमदानातून रस्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथील मारुती वस्ती व पोकळे वस्ती येथे  श्रमदानातून गावकऱ्यांनी रस्ता बनविला..

गावकऱ्यांनी केला श्रमदानातून रस्ता Read More »

गावात अभ्यासिका सुरु

ग्रामीण भागातील तरुणांना MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी गावातच शांत आणि अभ्यासू वातावरण मिळावे, यासाठी ग्रामपंचायत ने मुख्यमंत्री समृद्ध योजनेतून अभ्यासिका सुरु केली आहे

गावात अभ्यासिका सुरु Read More »

ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. भात कापणी झाल्यानंतर उन्हाळी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारे बांधण्यात येतात. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळी भाजीपाला तसेच पशु-पक्षांना पाण्याची कमतरता जाणवत नाही. तसेच या बंधाऱ्यामुळे नदीतील पाणीसाठा वाढून शेतकरी व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार असून गावाच्या विकासाला चालना

ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा Read More »