ग्रामपंचायत कुरुंगवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. भात कापणी झाल्यानंतर उन्हाळी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी ग्रामस्थांकडून नदीवर वनराई बंधारे बांधण्यात येतात. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळी भाजीपाला तसेच पशु-पक्षांना पाण्याची कमतरता जाणवत नाही. तसेच या बंधाऱ्यामुळे नदीतील पाणीसाठा वाढून शेतकरी व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होणार असून गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामस्थांनी दगड, माती पिशव्यांच्या साहाय्याने श्रमदानातून हा बंधारा बांधून पूर्ण केला. याप्रसंगी कृषी विभागाचे सातपुते मॅडम , कुरुंगवाडी गावचे माजी सरपंच, माजी सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *