दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन व गणराज्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुरुंगवाडी येथे एक आगळावेगळा व समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी गावातील विधवा व एकल जेष्ठ महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांना सन्मान देण्याची अभिनव संकल्पना ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात उतरवली.
समाजात विधवा व एकल महिलांना सन्मान, संधी व आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने ग्रामपंचायत कुरुंगवाडी यांच्या वतीने हा अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच गोपाळ गोविंद सावंत , ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला भगिनी, शिक्षकवर्ग, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ग्रामपंचायत अधिकारी माधुरी सानप उपस्थित होते.
संपूर्ण गावाच्या साक्षीने पार पडलेला हा उपक्रम सामाजिक समतेचा व महिला सन्मानाचा प्रभावी संदेश देणारा ठरला.
